बांभोरी येथील गिरणा नदी च्या फुलावर अचानक ट्रकचा एक्सल तुटून ट्रक बंद पडल्याने चार तास महामार्गावर पूर्ण वाहतूक ठप्प झाले.
वाहतुकीच्या रांगा जळगाव शहरातील शिव कॉलनी पर्यंत होत्या व बांभोरी पुलापासून ते पाळधी गावा पर्यंत वाहणांच्या रांगा होत्या. नऊ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहने रांगेत थांबून होती. या रंगांमध्ये एसटी महामंडळाच्या 30 पेक्षा जास्त बसेस अडकल्या होत्या
बसमध्ये प्रवासी अडकले
एस.टी. महामंडळाच्या जिल्ह्यातील रवंजा, अजंनविहीरे, नांदेड, निंभोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर आणि धुळे, नाशिक येथून येणाऱ्या व जाणाऱ्या ४०पेक्षा अधिक बसेस या वाहतूक कोंडीत सापडल्या. त्या तीन तास उशिराने पोहचल्याचे एस.टी. नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले.
बांभोरीकडून जळगाव शहराकडे येणारी वाहतूक अशी ठप्प झालेली होती.
रुग्ण पोहचवून परतणारी एक रुग्णवाहिका अडकली
रुग्णांना जीएमसीत आणण्याचे काम करणाऱ्या १०८ क्रमांकाची पातोंडा येथील रुग्णवाहिका रुग्णाला जीएमसीत पोहचवून परत जात असताना यात अडकली. कोंडीत कुठलीही रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली नसल्याचे १०८ रुग्णवाहिकेची सेवा देणारे समन्वयक डॉ. राहुल जैन म्हणाले
थांबून होती. या रंगांमध्ये एसटी महामंडळाच्या 30 पेक्षा जास्त बसेस अडकल्या होत्या
साडेसात वाजेपर्यंत वाहतूक झाली सुरळीत
बसमध्ये प्रवासी अडकले
एस.टी. महामंडळाच्या जिल्ह्यातील रवंजा, अजंनविहीरे, नांदेड, निंभोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर आणि धुळे, नाशिक येथून येणाऱ्या व जाणाऱ्या ४०पेक्षा अधिक बसेस या वाहतूक कोंडीत सापडल्या. त्या तीन तास उशिराने पोहचल्याचे एस.टी. नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले.
पोलिस पथक मदतीला
महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर वाहतूक शाखा व महामार्ग पोलिसांनी परिश्रम घेतले. यात शहर वाहतूक शाखेचे ज्ञानेश्वर बागुल, किरण मराठे, प्रविण हिवराळे, योगेश पाटील, रविंद्र पाटील व सहकाऱ्यांनी रात्री साडेसातला वाहतूक सुरळीत केली
साडेसात वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली.




