चोपडा शहरात ला प्र वि विभागाने सापडा रचून एकास लाच घेतांना रंगेहात पकडले
यशस्वी सापळा कारवाई

तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता आ.लो.सेसहाय्यक अभियंता चोपडा दिलीप सुलक्षणें यांनी 5,500/- रूपये लाचेची मागणी केली बाबत तक्रारदार यांनी दि.11/3/2025 रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असता वरील आलोसे यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम 5500 व तडजोडअंती 4500 रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम दि.12/3/2025 रोजी स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा कार्यवाही पथक :- श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने
—————————————
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जळगाव येथे संपर्क करावा.