Uncategorized
Nitesh Rane : मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
Nitesh Rane
Nitesh Rane : मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Nitesh Rane : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणेंच्या आवाहनामुळे नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




