Uncategorized

पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जळगांव

जळगाव, (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील

बारीपाडा गावात शाश्वत विकासाचे प्रयोग करून गावाचा सर्वांगीण विकास करणारे  पवार यांचा सत्कार सोहळा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित, जळगाव संचलित नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी डॉ. रणजीत चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांच्या हस्ते सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी मा. डॉ. रणजीतजी चव्हाण यांनी ‘चालते बोलते विद्यापीठ म्हणजे चैत्रामजी पवार’ या शब्दात त्यांचा गौरव केला. त्यांना स्वतःला आलेले अनुभव कथन करून उपस्थितांना बारीपाडा गाव आणि चैत्रामजी पवार यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री चैत्राम पवार यांनी बारीपाडा हे छोटेसे गाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पोहोचविले, याबद्दल माहितीपट दाखविण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितले की स्वतः उच्चशिक्षित असून नोकरी न पत्करता घरच्यांचा विरोध पत्करून गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले. त्यासाठी घरातील, गावातील लोकांची मने वळवून त्यांना या कामात सहभागी करून घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल पाटील यांनी केले. आभार प्रा. तेजल पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.के.बी. पाटील, उपप्राचार्या एम. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा. इंदिरा पाटील, प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. डी.आर.चव्हाण, प्रा.एन.जे.पाटील, प्रा राकेश गोरसे, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा डॉ मंगला तायडे, प्रा वंदना पाटील, प प्रा. सुनील गरुड कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. आर.बी. देशमुख यांनी मेहनत घेतली तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!