रिक्षाचालकाकडून अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस हस्तगत करून कारवाई
शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई

जळगांव प्रतिनिधी – आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा घडू नये या दृष्टीने शहरात नाकाबंदी व सक्त पेट्रोलींग करून गुन्हेगारांना चेक करणेबाबत सूचना मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेडडी सो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते सो.व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग श्री. संदीप गावीत सो. दिलेल्या होत्या. काल दिनांक 28/03/2025 रोजी दुपारी 12.00 वा. सुमारास पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहीतीनुसार कुसुंबा ता. जि. जळगाव येथे राहणारा प्रवाशी अॅटोरीक्षा रजी. नंबर MH19CW6108 वरील रिक्षाचालक हा स्वतःचे कब्जात देशी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगुन आहे व तो दिनांक 28/03/2025 रोजी सकाळी त्याचे रिक्षातुन जळगाव येथे निघाला असुन तो कुसूंबा-अजंठा चौफुली-नेरीनाका मार्गे जळगाव शहरात येणार आहे अशी माहीती मिळाल्याने जळगाव शहरातील नेरी नाका येथे सदर ठिकाणी पो.नि. धारबळे व त्याचे अधिनस्त असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफने वेळेत पोहचून सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे राहुल रंगराव पाटील वय-32 वर्षे रा. कुसुंबा साई सिटी रोड, गणपतीनगर ता. जि. जळगाव यास ताब्यात घेवून त्याचे मालकीचे रजी. नंबर MH19CW6108 अॅटोरीक्षाचे ड्रायव्हर सिटचे खाली लपवून ठेवलेले एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल (तिचे मॅगजीन मध्ये 2 जिवंत राउंड (काडतुस) असलेली) मिळुन आल्याने शनिपेठ पो.स्टे. गु.र.नं. 73/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 (1-B) (a) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) चे उल्लंघन 135 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोना 3068 किरण वानखेडे, पोकॉ 2001 विकी इंगळे, पोकॉ 936 रविंद्र साबळे यांनी केलेली आहे. आरोपी राहुल रंगराव पाटील यास अटक करण्यात आलेली असुन त्यास आज दि. 29/03/2025 रोजी जळगाव येथील न्यायालयात हजर केले जाणार असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास शनिपेठ पो.स्टे. चे सहायक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी हे करीत आहे.





