
यावल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिमन्यू च व्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि सखावत तडवी यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक दिन प्रमुख मान्यवर, स्वस्त धान्य दुकानदार आणि इतर क्षेत्रातील नागरिकांच्या, ग्राहकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक ग्राहक हक्क दिन, शासना तर्फे दरवर्षी १५ मार्च रोजी ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण यांच्या समर्थनाच्या गरजेची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. सर्व स्तरातील ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्या हक्कांचा आदर आणि त्यांचे संरक्षण करण्याची संधी देणारा हा जागतिक अतिशय महत्त्वाचा ग्राहक दिवस आहे.
कोणत्याही वस्तू, वस्तू आणि सेवांच्या मार्केटिंगपासून संरक्षण मिळण्याचा हा ग्राहकांचा हक्क आहे, जे त्यांच्या हिताचे आहे. ग्राहकाला ते खरेदी करत असलेल्या वस्तूबद्दल माहिती मिळण्याचा अधिकार आहे. हे वस्तू किंवा सेवेची गुणवत्ता, प्रम सामर्थ्य, शुद्धता, मानक आणि किंमत यांच्याशी संब आहे.
याबाबत कार्यक्रमाचे अध्यक्ष सकावत तडवी, पुरवठा विभागातील अधिकारी वाय.डी.पाटील, वानखेडे, मुंदरे, बाळकृष्ण वाणी, एस, टी. महामंडळ यावल आगारातील खतीब तडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन गुरव यांनी केले तर आभार शेख नासीर यांनी मानले.




