सीड्स बॉल बनवणे उपक्रम माय एफ एम द्वारा रायसोनी सेमी इंग्लिश शाळेत पार पडला

सीड्स बॉल बनवणे उपक्रम माय एफ एम द्वारा रायसोनी सेमी इंग्लिश शाळेत पार पडला
प्रतिनिधी जळगांव – आज दिनांक २६ जून रोजी रायसोनी सेमी इंग्रजी शाळा व माय एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने सीड्स बॉल बनवणे उपक्रम राबविण्यात आला. उपक्रम राबवण्यामागचे उद्दिष्ट माय एफ एम चे आर के देवा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आषाढी एकादशीनिमित्त वारकरी वारीला जात असताना ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासारखी जागा मिळेल त्या ठिकाणी हे सीड्स बॉल लावण्यात येणार आहेत व हरित वारी द्वारा हरित देश निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लिंब,चिंच,जांभूळ,बोर पिंपळ, वड अशा विविध प्रकारच्या वृक्षांचे सीड्स बॉल तयार केले विठ्ठलाच्या नाम घोष करत विद्यार्थ्यांनी सीड्स बॉल बनवले मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले व प्रत्येक घरी एक वृक्ष लावण्याचे आव्हान केले उपक्रमास शाळा अध्यक्ष शिरीषभाऊ रायसोनी यांचे अनमोल सहकार्य कार्यक्रमास लाभले शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले


