Uncategorized

पारोळा तालुक्यातील मोडाळा येथील वनपाल दिलीप पाटील आणि चोरवड येथील वनपाल वैशाली गायकवाड ८ हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळाली.

पारोळा प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील मोडाळा येथील वनपाल दिलीप पाटील आणि चोरवड येथील वनपाल वैशाली गायकवाड ८ हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळाली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेत मालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात ६० हजार रुपयांचा सौदा झालेला होता त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी पारोळा तालुक्यातील मोडाळा येथील दिलीप भाईदास पाटील (वनपाल) यांनी तक्रार यांच्याकडे ८ हजार रुपये लाचेची मागणी केली करीत असल्याबाबत दि. १९ जून २०२५ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे दि. १९ जून रोजी पडताळणी केली असता वनपाल दिलीप पाटील याने ८ हजाराची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज दि.२ जुलै २०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून वनपाल दिलीप भाईदास पाटील यांचे सांगणे वरून

वनपाल दिलीप पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून मोबाईल जप्त करण्यात आले आहे. तसेच वैशाली गायकवाड यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तसेच पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्र अधि. १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सदर कारवाई

जळगांव ला.प्र.वि.चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सूर्यवंशी, यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!