Uncategorizedआर्थिक घडामोडी
बि यु एन रायसोनी सेमी मराठी/ इंग्लिश मिडीयम शाळेमध्येआषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

जळगांव प्रतिनिधी – बि यु एन रायसोनी सेमी मराठी/ इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये दिनांक 5-7-2025 वार शनिवार आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पालखीचे पूजन विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील आपल्या बाल चिमुकल्यांचे पूजन शाळेचे अध्यक्ष श्री शिरीषजीं रायसोनी यांच्या हस्ते करण्यात आले दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने बाल चिमुकल्यांनी विविध वेशभूषाबी परिधान केलेली होती. घोडेस्वार विठ्ठल रुक्मिणी दिंडी सोहळ्यामध्ये प्रदर्शित करण्यात आली. दिंडी सोहळ्याचे आयोजन दोन्ही माध्यमाचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थिती मध्ये पार पाडण्यात आले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.



