आर्थिक घडामोडी

डॉक्टरांकडून पेशन्टला चुकीची माहिती

चुकीची माहिती दिल्याने डॉक्टर निलंबित

चोपडा प्रतिनिधी : एका महिलेच्या किडन्या फेल असल्याचा चुकीचा रिपोर्ट येथील महालॅबकडून देण्यात आला होता. या प्रकरणी डॉ. उमेश कोल्हे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी  दिली.

शहरातील एक महिला आजारी असल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल होती. या महिलेचे रिपोर्ट पाहून किडनी फेल असल्याचा अहवाल चोपडा महालॅबने दिला होता. नंतर महिलेने – दुसरीकडे खातरजमा केली असता – असा कुठलाही प्रकार नसल्याचे समोर आले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय – अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी महालॅबची चौकशी करण्याकामी त्रिसदस्यीय समिती नेमली होती.

समिती सदस्य डॉ. सागर पाटील, डॉ.पवन पाटील, डॉ. तृप्ती पाटील यांनी आपला अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवला. तो अहवाल आणि महालॅबचे जिल्हा समन्वयक धीरज पानपाटील यांच्या अहवालानुसार सोमवारी डॉ. उमेश कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले.

तक्रारदार नरेंद्र पाटील, भाजप शहराध्यक्ष चोपडा  महालॅबमध्ये रुग्णांच्या रक्ताच्या चाचणी अहवालावर डिजिटल सह्या करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या महालॅब यंत्रणेची चौकशी व्हावी, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन करणार आहोत. तसेच डॉ. कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!