माहिती तंत्रज्ञान

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील सम्राट कॉलनी परिसरात येथील एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील सम्राट कॉलनी परिसरात येथील एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली

आज, सोमवार, दि. २८ जुलै रोजी, शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या एका आरोपीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय-२५) रा. पिपल बँकेच्या समोर, तुकारामवाडी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक लोखंडी चॉपर जप्त करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.कॉ. योगेश कडुबा घुगे व त्यांच्या गुन्हे शोध पथकातील पो.उप. निरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेका. गणेश शिरसाळे, पो.हे. काँ संदीप सपकाळे आणि पो.ना. विकास सातदिवे यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावून कळवले की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केलेला आरोपी पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर हा सम्राट कॉलनी परिसरात हत्यारासह फिरत आहे. याबाबत खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस पथकाने तात्काळ खाजगी वाहनाने सम्राट कॉलनी परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. जोशी टेंन्ट हाऊसजवळील गल्लीमध्ये पवन बाविस्कर उभा दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, पो.कॉ. योगेश कडुबा घुगे आणि पो.ना. विकास सातदिवे यांनी त्याचा पाठलाग करून दुपारी १३:३० वाजता त्याला ताब्यात घेतले.

तो हद्दपार असल्याची माहिती असल्याने, त्याला जळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्याची पोलीस अधीक्षक किंवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही परवानगी आहे का, असे विचारले असता त्याने परवानगी नसल्याचे सांगितले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे १००/- रुपये किमतीचे एक लोखंडी चॉपर आढळून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!