जसा ईईएसएलसोबत करार संपला लग्गेच महानगरपालिकेने जळगांव शहरात पाथदिवे लावायला सुरुवात केली
नेहरू चौकात पथदिवे लावतांना ज.श.म.न.पा कर्मचारी


जळगाव प्रतिनिधी – जसा ईईएसएलसोबत करार संपला लग्गेच शहरात अनेक पथदिवे बंद होते ते त्वरित जळगांव शहर महानगरपालिकेणे सुधरवणे चालू केले आहे नागरिकांना होणारा त्रास लवकरच संपणार आहे. ईईएसएलसोबत १४ फेब्रुवारी २०१८ रोजी, सात वर्षांसाठी केलेला पथदिव्यांच्या व्यवस्थापनाचा करार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात आला आहे.
या करारामुळे गेल्या काही काळापासून महापालिकेला पथदिव्यांची दुरुस्ती आणि नवीन दिवे बसवण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः, कंपनीशी असलेल्या वादामुळे निर्णय प्रक्रिया थांबली होती. आता करार संपल्यामुळे महापालिका स्वतः दुरुस्ती आणि नवीन दिवे बसवू शकेल. राज्य सरकारने तांत्रिक समिती नेमली आहे.
सद्यस्थितीत शहरात ईईएसएलने बसवलेल्या पथदिव्यांपैकी तब्बल १० टक्के पथदिवे बंद आहेत. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी जळगावकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता हा करार संपल्याने आणि सरकारने नवीन समिती नेमल्याने, महापालिकेला पथदिव्यांची कामे स्वतःच करायला मिळणार आहेत. यामुळे बंद पथदिवे लवकर सुरू होतील. जे दिवे आता बंद आहेत, ते तातडीने दुरुस्त करून पुन्हा चालू करता येतील.
जिथे गरज आहे, तिथे नवीन पथदिवे बसवण्याची प्रक्रिया वेगवान होईल. समितीमुळे योग्य दरात कामे होतील आणि महापालिकेच्या पैशांचा चांगला वापर होईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जळगावातील पथदिव्यांची समस्या सोडवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच शहर पुन्हा प्रकाशाने उजळून निघेल, अशी अपेक्षा आहे.





