माहिती तंत्रज्ञान

सराईतपणे घरफोडी करणारा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले

जळगाव प्रतिनिधी – शहरातील गेल्या ४ महिन्यांपासून फरार असलेला व सराईतपणे घरफोडी करणारा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून २७ जुलै २०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले. आरोपींना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच घरफोड्यांची कबुली दिली आहे. मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह (वय-२४) रा. मस्जिद जवळ शिरसोली जळगाव, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की,रामानंद नगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०२४ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापुर्वी सागर शिवराम डोईफोडे (वय-२८, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली होती. त्याने चोरीचा मुद्देमाल पोलीसांना दिला होता. दरम्यान सागर डोईफोडे याने हा गुन्हा त्याचा साथीदार मुस्तिकीन उर्फ जुनेद भिकन शाह, रवी प्रकाश चव्हाण आणि नितीन चव्हाण (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांच्या सोबत केल्याची कबुली दिली. तेव्हापासून हे संशयित फरार होते.

दरम्यान, आरोपी मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह याला पोलिसांच्या शोधाची कुणकुण लागल्याने तो सुरत येथे पळून गेला होता. परंतु, २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अक्रम शेख आणि पोशि रवींद्र कापडणे यांना गुप्त माहिती मिळाली की, मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह जळगाव शहरात येणार आहे. या माहितीची खात्री करून त्यांनी सिंधी कॉलनी परिसरात दुपारी ३ वाजता सापळा रचला आणि मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह यास ताब्यात घेतले. त्याने अजून इतर चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सोमवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१) रामानंदनगर पो.स्टे. गुरनं. ०४/२०२५, भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४) प्रमाणे.

२) रामानंदनगर पो.स्टे. गुरनं. १४/२०२५, भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे.

३) रामानंदनगर पो.स्टे. गुरनं. ३३८/२०२४, भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४) 

प्रमाणे सदरची कारवाई मा.श्री. डॉ महेश्वर रेड्डी सोो. पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री अशोक नखाते सो. अपर पोलीस अधिक्षक जळगाव, मा.श्री. संदीप गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग जळगाव, श्री संदीप पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पो.हे.का. अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रविण भालेराव, पोना किशोर पाटील, पोशि रविंद्र कापडणे चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!