आर्थिक घडामोडी
परिमल, सनोपी व सिव्हिल हॉस्पिटल जळगाव यांच्यातर्फे खेडी बु जळगांव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
खेडी बु जळगांव येथे मोफत आरोग्य तपासणी

जळगांव महाराष्ट्र न्यूज

जळगांव प्रतिनिधी – परिमल, सनोपी व सिव्हिल हॉस्पिटल जळगाव यांच्यातर्फे खेडी बु जळगांव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन· करण्यात आले. या शिबिरात मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी अशा विविध आरोग्य समस्यांची तपासणी करण्यात आली. या संस्थेतर्फे तपासणी करण्यात आलेल्या पेशंटला मोफत औषधी देण्यात आली यावेळी विक्की भाऊ पाटील, सुकदेव भाऊ रायसिंग, प्रमोद भाऊ ठोंबरे, रुपेश बच्छाव आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खेडी बु येथे प्रत्येक महिन्याच्या ११ किंवा १२ तारखेला शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.



