महाराष्ट्र

कन्नड तालुक्यातिल नागद येथे स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा

 

(ता. प्रतिनिधि) आसिफ पठान

कन्नड तालुक्यातील नागद येथील जिल्हा परिषद शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून टाकले. त्यानंतर ध्वजारोहण झाले. कवायत, देशभक्तीपर गीत, नृत्य आणि लघुनाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच नाना भाऊ अहीरे, माजी सरपंच राजधर भाऊ अहीरे, समस्त ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर पुढारी मंडळी, तसेच संपूर्ण शालेय कर्मचारीवर्ग आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देत देशभक्ती, एकता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!