बहुजन समाज पक्ष, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जामनेर व पाचोरा या ठिकाणी ढगफुटी मुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान भरपाई करून द्यावे असे निवेदन 1

जळगांव प्रतिनिधी -बहुजन समाज पक्ष, जळगाव जिल्हा यांच्या वतीने मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जळगाव जिल्ह्यात व त्या सह छ. संभाजी नगर जिल्हयाच्या सिमेलगत असणाऱ्या पाचोरा तालुका, जामनेर तालुका या ठिकाणी ढगफुटी मुळे खुप हानी झाली आहे. तसेच राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाची अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट ओढावले आहे.
या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जमीन धूप, शेतीवरील अधोसंरचनेचे विघटन आणि शेतकरी वर्ग आणखी आर्थिक व सामाजिक संकटात सापडला आहे. शेतकरी समाज हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मात्र सध्या हजारो कुटुंबे पिकांचे नुकसान, वाढते कर्ज व दैनंदिन उपजीविकेचे प्रश्न यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाची तातडीची हस्तक्षेपात्मक मदत फारच आवश्यक ठरते.
त्या दृष्टीने, आपण त्वरित खालील उपाययोजना कराव्यात अशी आमची विनंती आहे:
प्रभावित शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व पॅकेज जाहीर करावे,
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना जळगांव जिल्हा अध्यक्ष – आनंद खयरे,आधार सिंगारे,सुनिलजी खयरे व बसपा चे कार्यकर्ते उपस्थित होते




