इमरान पटेल हत्याकांड व ५ वर्षीय बालकावरच्या अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी तातडीची व निष्पक्ष कारवाई करा – एकता संघटनेची मागणी


यावल प्रतिनिधी – जळगाव जिल्हा एकता संघटनेने यावल पोलिस स्टेशन येथे तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मानवी हक्क आयोग यांना निवेदन देत दोन गंभीर घटनांबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
इमरान पटेल हत्या प्रकरण
यावल तालुक्यात दहीगाव येथे घडलेल्या हत्या प्रकरणात सुरुवातीला किरकोळ वाद सांगण्यात आला. परंतु प्रत्यक्षात हा मुस्लिम समाजातील युवकावरील लक्षित हल्ला असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या तहेसिन पूनावाला विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या १७ जुलै १८ निर्णयातील दिशानिर्देशांनुसार केली जावी अशी ठाम मागणी संघटनेने केली. तसेच या संपूर्ण घटनेत दोन युवतींचा सुद्धा समावेश असल्याने त्यांच्यावर सुद्धा त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी मागणी करण्यात आली.
पाच वर्षीय अल्पवयीन मुलावर अमानुष अत्याचार व हत्या
या घटनेत निरपराध बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला असताना सुद्धा मुख्य आरोपीस इतर आरोपींनी (जबाबात नावे दिली आहे) गुन्हा लपवण्यासाठी कट रचल्याचे स्पष्ट असून, सी सी टी वी फुटेजमधून पुरावे समोर आले आहेत. तरीही पोलीस प्रशासनाकडून योग्य ती तातडीची कारवाई होत नाही, हे धक्कादायक आहे.
एकता संघटने चे समन्वयक फारुक शेख यांनी इशारा दिला की, “जर दोन्ही प्रकरणात निष्पक्ष व कठोर कारवाई झाली नाही तर संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. व उच्च न्यायालयात दाद मागेल”
एकता संघटन व फिर्यादी च्या प्रमुख मागण्या
१) दोन्ही प्रकरणांची निष्पक्ष व जलद चौकशी करण्यात यावी.
२) दोन्ही पीडित कुटुंबांना बी एन एस एस कलम ३९६ व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम अंतर्गत तातडीने आर्थिक मदत द्यावी.
३)दोन्ही खटले फास्ट-ट्रॅक कोर्टात सहा महिन्यांत निकाली काढावेत.
४) दोन्ही गुन्हे प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन समाजात आदर्श निर्माण करावा.
दोन्ही फिर्यादींचे पुरवणी जबाब व इतर आरोपींना अटकेचे आश्वासन
लहान बालकाचे आजोबा यासीन खान व इम्रान पटेल चे वडील युनूस पटेल या दोघा फिर्यादींचे पुरवणी जबाब देण्यात आले. त्याच सोबत एकता संघटने तर्फे सुप्रीम कोर्टाचे सायटेशन, पेनड्राईव , गोपनीय पत्रे देऊन त्यात त्यांनी नमूद केलेल्या आरोपींचा सहभाग सुद्धा पुराव्यांनिशी केला असल्याने त्याबाबत दोन्ही गुन्ह्यातील इतर आरोपींवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक धारबळे यांनी शिष्टमंडळाला दिले.
पोलिस निरीक्षक धारबाडे यांना निवेदन, पुरवणी जबाब देताना फिर्यादी इसा पटेल व यासीन खान सह फारुक शेख,एकता संघटने च्या शिष्ट मंडळात यांचा सहभाग होता





