भारतीय जनता पार्टीच्या “बेटी बचाव, बेटी पढाओ” पाचोरा तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

पाचोरा प्रतिनिधी – तालुक्यातील वरखेडी गावचा अभिमान असलेल्या कु. चेतना रणदीप हिरे (सुतार )यांची भारतीय जनता पार्टीच्या “बेटी बचाव, बेटी पढाओ” पाचोरा तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या भव्य परिवर्तन मेळाव्यात हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या वेळी खासदार सौ. स्मिताताई वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, दिलीपभाऊ वाघ, अमोलभाऊ शिंदे, प्रतापनाना पाटील, वैशालीताई सूर्यवंशी आणि नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते चेतना हिरे सुतार यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मेळाव्यात विविध मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात उत्साह, टाळ्यांचा गजर आणि “जय भारत, जय भाजपा” च्या घोषणांनी कार्यक्रम रंगला.
या नियुक्तीमुळे वरखेडी तसेच पाचोरा तालुक्यात अभिमानाची लाट उसळली असून, कु. चेतना रणदीप हिरे (सुतार)यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या कार्यकाळात “बेटी बचाव, बेटी पढाओ” मोहिमेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.



