आर्थिक घडामोडी

जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून अनुदान

जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून, अनुदान प्राप्त झाले असून तालुकास्तरावरुन या अनुदान वाटपाबाबतचे काम सुरु आहे.

शासनाच्या निर्देशानुसार ई केवायसी पोर्टल ५ नोव्हेंबर २०२५ पासुन सुरु झाले असून ज्या शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!