आर्थिक घडामोडीमहाराष्ट्रमहिला विशेष

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली.

जळगाव (प्रतिनिधी)-जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते. सोडतीदरम्यान प्रभागनिहाय चिठ्ठ्या निघताच सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण होत होते. अनेक इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षा, गणिते आणि राजकीय आकांक्षा या सोडतीसोबतच उलगडल्या. अखेर आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले असून आता पक्षांतर्गत तिकीट वाटपावरून रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

या सोडतीनुसार १९ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये ‘ड’ हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून, अनेक विद्यमान नगरसेवकांचे गणित कायम राहिले आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या प्रचंड असून, सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. भावी नगरसेवकांच्या सोशल मीडिया मोहिमा पुढील काही दिवसांत जोर पकडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सदर आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खाली प्रत्येक प्रभागनिहाय (अ, ब, क, ड) आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक १

अ – अनुसूचित जाती महिला |ब नागरिकांचा मागासवर्ग | क सर्वसाधारण महिला |ड -सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २

अ – अनुसूचित जमाती | ब- नागरिकांचा मागासवर्ग महिला | क – सर्वसाधारण महिला | ड- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३ 

अ – अनुसूचित जाती महिला |ब – अनुसूचित जमाती महिला।क – नागरिकांचा मागासवर्ग ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४

अ – अनुसूचित जाती महिला |ब नागरिकांचा मागासवर्ग |क- सर्वसाधारण महिला |ड -सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला |ब सर्वसाधारण महिला| क- सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला |ब सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला |ब सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ८

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला |ब सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला |ब – सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १०

अ – अनुसूचित जाती | ब- नागरिकांचा मागासवर्ग महिला | क -सर्वसाधारण महिला |ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ११

अ – अनुसूचित जमाती महिला | ब नागरिकांचा मागासवर्ग ।क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १२

अ – अनुसूचित जाती | ब- नागरिकांचा मागासवर्ग महिला | क- सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १३

अ – नागरिकांचा मागासवर्ग | ब सर्वसाधारण महिला | क सर्वसाधारण महिला | ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १४

अ – नागरिकांचा मागासवर्ग | ब सर्वसाधारण महिला | कसर्वसाधारण महिला |ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १५

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला | ब सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १६

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला |ब सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १७

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला | ब सर्वसाधारण महिला| क – सर्वसाधारण महिला |ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १८

अ – अनुसूचित जमाती | ब नागरिकांचा मागासवर्ग महिला |क – सर्वसाधारण महिला | ड

प्रभाग क्रमांक १९

अ – नागरिकांचा मागासवर्ग महिला | ब – नागरिकांचामागासवर्ग महिला | क सर्वसाधारण महिला | डसर्वसाधारण महिला

या आरक्षणामुळे महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांचा सहभाग लक्षणीय वाढणार आहे. काही प्रभागांमध्ये सलग दुसऱ्यांदा महिलांसाठी जागा राखीव झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!