लाडक्या बहिणींना मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू! घरबसल्या अर्ज करा आणि फ्री भांडी सेट मिळवा!
मोफत भांडी वाटप योजना


महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक नवीन आणि उपयोगी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे मोफत भांडी योजना (Mofat Bhandi Yojana). या योजनेअंतर्गत, जे कामगार मंडळात नोंदणीकृत आहेत, त्यांना घरात वापरायची आवश्यक भांडी मोफत दिली जाणार आहेत.
या योजनेमुळे गरीब आणि गरजू बांधकाम कामगारांना मोठा फायदा होईल. अनेक वेळा कामगारांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी पैसे साठवणे अवघड जाते. पण या योजनेमुळे त्यांना भांडी खरेदीसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्यामुळे त्यांची थोडी आर्थिक बचत होईल आणि त्यांचे जीवन थोडे सोपे होईल.

या योजनेसाठी पात्रता अटी:
1- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2- तो महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असावा.
3- मागील १२ महिन्यांमध्ये किमान ९० दिवस तो बांधकाम क्षेत्रात काम केलेला असावा.
4- अर्जदाराने यापूर्वी सरकारी भांडी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड,रहिवाशी प्रमाणपत्र,कामगार नोंदणी प्रमाणपत्र,बँक पासबुकची झेरॉक्स,९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचा फोटो,वयाचा पुरावा (उदा. शाळा सोडल्याचा दाखला),स्वयंघोषणापत्र




