वर्षभरातच आगीच्या 30 घटना, तरीही फायर ऑडिट केले नाही एमआयडीसीतील घटनांबाबत बैठकीत जिल्हाधिकारी घुगे भडकले

वर्षभरातच आगीच्या 30 घटना, तरीही फायर ऑडिट केले नाही एमआयडीसीतील घटनांबाबत बैठकीत जिल्हाधिकारी घुगे भडकले
जळगाव प्रतिनिधी– एमआयडीसीत गेल्या वर्षभरात लहान-मोठ्या आगीच्या ३० घटना घडल्या आहेत. या घटनांचे कारण, कंपन्यांचे ऑडिट का होत नाही, घटनांनंतर कारणमीमांसा काय, एमआयडीसीत घरे बांधण्याची परवानगी दिली कोणी, आग प्रतिबंधक उपयायोजना प्रभावी का नाही? असे प्रश्न जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवारी बैठकीत एमआयडीसी संबधित अधिकाऱ्यांना विचारले. मात्र, ते उत्तरे देऊ शकले नाहीत.
घुगे यांनी एमआयडीसीचे उपअभियंता, प्रादेशिक अधिकारी, पोलिस, औद्योगिक सुरक्षा -व आरोग्य विभाग, महावितरण, मनपाचा अग्निशमन विभाग यांच्या संबधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सर्व विभागांनी आगींच्या बाबतीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ देण्याचे आदेश करण्यात आले. एमआयडीसीत वारंवार आगी लागताहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी संयुक्त समन्वय आढावा बैठक घेतली. त्यात विभागांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आगीची संभाव्य कारणे, आग प्रतिबंधक व सुरक्षा यंत्रणांची स्थिती, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, तसेच औद्योगिक आस्थापनांकडून सुरक्षा नियमांचे पालन या सर्व बाबतीत सर्वच विभागांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे या बैठकीतील चर्चेवरुन समोर आले. एमआयडीसी परिसरातील मनपाचे बंद असलेले फायर स्टेशन
एमआयडीसी तयार करणार आहे. बांधकामासाठी १७कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा एमआयडीसीने केला नाही. हे स्टेशन सुरू झाल्यास एमआयडीसीत आग लवकर नियंत्रणात येऊ शकते असे सांगण्यात आले.
आग : कारणमीमांसा आता २४ तासांत आगीचे सविस्तर पंचनामे पोलिसांनी करणे अपेक्षित
आहे. घटनेनंतर २४ तासात संभाव्य कारणे सांगणारा अहवाल पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा. आगीच्या घटनांत दोषी असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, उद्योगांना फायर ऑडिट सक्तीने पूर्ण करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.





