जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्रीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मोठी कारवाई

जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व विक्रीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मोठी कारवाई करत एका इसमास जेरबंद केले असून सुमारे १० लाख १९ हजार २० रुपये किंमतीचा अवैध गुटखा व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले आहे.
मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार तसेच मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव आणि मा. सुभाष ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. राहुल गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अर्टिगा (MH-46 AT 1065) या वाहनातून मुक्ताईनगर मार्गे बऱ्हाणपूर (म.प्र.) ते छत्रपती संभाजीनगर येथे अवैध गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुरनाड फाटा येथे सापळा रचला. संशयित वाहन भरधाव वेगात येत असताना थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन पळवले. अखेर खामखेडा गावाच्या दिशेने पाठलाग करून वाहन थांबवण्यात यश आले.
वाहन चालकाचे नाव अरबाज नौशाद बेग (वय ३०, रा. काझी हाऊस, खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे असून त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे —
रजनीगंधा सुगंधीत पानमसाला,करमचंद प्रीमियम पानमसाला,मिराज तंबाखू,विमल पानमसाला,पानपराग,जाफराणी जर्दा,मारुती सुझुकी अर्टिगा वाहन,मोबाईल फोन
एकूण मुद्देमालाची किंमत ₹10,19,020/- इतकी आहे.

ही कारवाई स.पो.नि. जयेश पाटील, पोउनि निलेश गोसावी, पोह. विजय पाटील, श्रीकृष्ण पाटील, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र चौधरी, सलीम तडवी, छगन तायडे, रतनहरी गिते, हेमंत पाटील (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच पो.अं. गोविंद सुरवाडे व गोविंद पवार (मुक्ताईनगर पोलीस स्टेशन) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




