महाराष्ट्रमहिला विशेष

अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत १३ वर्षीय मुलीवर २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केला

जळगांव प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत १३ वर्षीय मुलीवर २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केला . ही धक्कादायक घटना १९ फेब्रुवारी रोजी जळगावच्या शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात घडली. याप्रकरणी दीपक रतीलाल कोळी (वय २७) याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी आला होता. त्याने या मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिच्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत मुलीवर अत्याचार केला.

मुलीला चालताना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी तिच्या वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

याविषयी कुटुंबीयांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक कोळी याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!