महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा ‘खान्देश एक्स्प्रेस’ महामार्ग! सहापदरी, 105 किमी लांब मार्गाने थेट समृद्धीला जोडणार

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा व उत्तर महाराष्ट्र – मराठवाड्याला जोडणारा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग आता सहापदरी ‘खान्देश एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग थेट ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’ला जोडला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात या महामार्गाबाबत आश्वासन दिले होते, याची आठवण करून देत खडसे म्हणाले, ‘घोषणा होऊन बराच काळ लोटला, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? हा मार्ग केवळ कागदावरच राहणार का?’ असा थेट सवाल आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!