Uncategorizedमहाराष्ट्र
जय भिम तरुण मित्र मंडळा तर्फे खीरदान वाटपाचा कार्यक्रम
जळगांव शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यक्रम पार

जळगांव प्रतिनिधी – काल दि 12/05/2025 रोजी जळगांव शहरातील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय ऐथे जय भिम तरुण मित्र मंडळ मेस्को माता नगर, जुने जळगांव येथील नवयुवक तरुणांनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त खीरदान वाटपाचा चांगला व सुशोभीकरण कार्यक्रम जळगांव ऐथे पार पडला.
कार्यक्रमाच्या वेळी जितू भाऊ सोनवणे यांनी तथागत गौतम बुध्द्धांनी संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला व तथागतांच्या जन्म दिनी खीरदान का करतात असे आपल्या भाषणात व्यक्त केले व ते आपण स्वीकार करावे असे नवयुवक तरुणांना सांगितले तसेच भारत व पाकिस्तान युद्धात शाहिद झालेले भारतीय जवानांना श्रद्धांजली दिली.
जयभिम तरुण मित्र मंडळ मेस्को माता नगर जळगांव सतत असेच छोटे मोठे कार्यक्रम यापुढे राबवणार व गरजून्ना मदत करत राहू असेही त्यानीं सांगितले.




