Uncategorized
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामसेवक पंकज चव्हाण हे घरी बसून करत आहे कामे
एका महिण्यापासून बहाळ गावात ग्रामसेवकच नाही

चाळीसगाव प्रतिनिधी – हंसराज पगारे तालुक्यातील बहाळ गावाचे ग्रामपंचायत दप्तर गेल्या एक महिन्यापासून ग्रामसेवक पंकज चव्हाण यांनी ते दप्तर आपल्या घरी घेऊन गेले होते. बहाळ ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मोरे यांनी बीडीओ अन्सार शेक साहेब यांना निवेदन देऊन ते दप्तर ग्राम विस्तार अधिकारी सोनवणे साहेब ग्राम विस्तार अधिकारी सपकाळे साहेब यांच्या हस्ते ते दप्तर नवीन ग्रामसेवक विजया पाटील यांच्याकडे आज दिनांक 23 -जुन -2025 सोमवार रोजी सोपवण्यात आले दप्तराची जबाबदारी विजया पाटील यांच्याकडे राहील अशी सूचना शेख अन्सार सर यांनी दिली.
ग्रामसेवक पंकज चव्हाण हे अशाच प्रकारे आपल्या मनाची मनमानी करत आहेत. तरी गावाचे सरपंच व नवीन ग्रामसेवक मॅडम विजया पाटील हे गावाचे कामकाज बघणार असे त्यानीं सांगितले.




