बी.यू.एन.रायसोनी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी

बी.यू.एन.रायसोनी शाळेत गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी
जळगाव प्रतिनिधी : बी.यू.एन.रायसोनी शाळेत दि.10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु व शिष्य अशा भूमिका साकारल्या होत्या.

गुरू द्रोणाचार्य व अर्जुन, श्रीकृष्ण आणि सांदिपनी, सावित्रीबाई फुले व विद्यार्थी, श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता अशा अनेक भूमिका उत्कृष्ट रीतीने साकारल्या .इ.2री च्या विद्यार्थ्यांनी “गुरुवर जैसा कोई नहीं “या गीतावर नृत्य सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी गुरु व शिष्यांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या त्याचप्रमाणें काही विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला.यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री शिरीष रायसोनी यांनी मुलांचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर पाटील व मुख्याध्यापिका श्रीमती रेखा कोळंबे याचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.



