महाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञान
जळगांव शहर महानगरपालिकेत आता मनीषा उगले मुख्य वैद्यकीय अधिकारी

जळगाव प्रतिनिधी – महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या जागी जन्म, मृत्यू विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा उगले यांची नियुक्त झाली आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी याबाबतचे आदेश काढले असून घोलप यांना मुख्यालय न सोडण्याची तंबी देण्यात आली आहे.
घोलप यांना जन्म-मृत्यू विभागात कंत्राटी पत्नीच्या जागी पती काम करीत असल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले असून, सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल समितीने अजून सादर केलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाची टांगती तलवार कायम आहे.
अशी माहिती जळगांव शराचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.





