महाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञान

कन्नड तालुक्यातील नागाद येथे गडदगड नदीत आढळला मृतदेह

 

तालुका (प्रिनिधी:आसिफ पठाण)

 

 जळगांव प्रतिनिधी-  तालुका (प्रिनिधी:आसिफ पठाण)  कन्नड तालुक्यातील नागद  येथून जवळच असलेल्या गडदगड नदीच्या अंजनडोहात शनिवारी (दि. ९) एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. जनावरे पाणी पाजण्यासाठी आलेल्या गुराख्यांना हा मृतदेह प्रथम दिसला. मृताची ओळख कैलास शंकराव वाघ (रा. निमभोर, ता. भडगाव) अशी पटली आहे.

घटनास्थळी नागद चौकीचे हेड कॉन्स्टेबल सुनील बोन्द्रे यांनी गुराख्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. डॉक्टर मयुरी पाटील, परिचारक संजय पाटील व शेखर राठोड यांनी पंचनामा व शवविच्छेदन केले. वाघ यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!